धनादेशाचा अनादर : भुसावळातील केदार सानप यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा


Dishonor of cheque: Court sentenced Kedar Sanap of Bhusawal भुसावळ : शहरातील रहिवासी केदार वामन सानप यांनी उद्योजक मनोज बन्सीलाल बियाणी यांच्याकडून पाच लाख रुपये हात उसनवारीने घेतल्यानंतर त्यापोटी बियाणींना धनादेश दिला मात्र धनादेश न वटल्याने मनोज बियाणी यांनी या प्रकरणी न्यायालयात धनादेश अनादरप्रकरणी खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्या.के.एस. खंडारे 13 जानेवारी 2023 या दिवशी निकाल देत सानप यांना दोषी धरले आहे.

तर एक महिन्यांचा कारावास
सानप यांनी धनादेशातील पाच लाख रुपये व 19 जुलै 2019 पासून ते 13 जानेवारी 2023 पर्यंत एक लाख पाच हजार व्याज असे एकूण सहा लाख पाच हजार रूपये इतकी नुकसान भरपाई म्हणून शिक्षा सुनावली तर दंडाची रक्कम भरण्यास कसूर केल्यास एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असे आदेश पारीत केले आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !