साडेतीन लाखांच्या दागिण्यांसह नववधू यावलमधून रफुचक्कर : पाच संशयीतांविरोधात गुन्हा


Bride robbed from Yaval with jewelery worth three and a half lakhs : Crime against five suspects यावल : लग्नाच्या अवघ्या चौथ्या दिवशीत नववधूने साडेतीन लाखा रुपयांचे दागिणे घेवून पळ काढल्याची धक्कादायक बाब शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी नववधू पाच संशयीतांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पार्लरमधून केले पलायन
यावलच्या वाणी गल्लीतील रहिवासी चित्तरंजन जयप्रकाश गर्गे या युवकाच्या विवाहासाठी बर्‍हाणपूर येथील नातेवाईक अशोक सुधाकर जरीवाले यांनी शिर्डी येथील शीला साईनाथ अनर्थे (पाटील) या महिलेस सूचित केले होते. शीला अनर्थे यांनी नाशिक येथील माया संजय जोशी या मुलीच्या नाशिक येथील तिच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवल्यानंतर मुलगी पसंत असल्याचे गर्गे यांनी कळविल्यावर 15 जानेवारी रोजी मुलीसह तिचे कुटुंबीय व शिला अनर्थे यावल येथील गर्गे यांच्या घरी आले. मुलीकडील मंडळीला मुलाचे घर आवडल्यानंतर त्यांनी मुलीचे लग्न लावून देण्यासाठी दोन लाखांची मागणी केली. त्यापैकी त्या दिवशी 50 हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन उर्वरीत रक्कम लग्नाचे दिवशी देण्याचे ठरले. त्यानंतर नाशिक येथून बर्‍हाणपूर येथे विवाह लावण्यासाठी गर्गे यांनी पे फो द्वारे वाहनभाडे बारा हजार रुपये पाठवले तर 30 जानेवारी रोजी बर्‍हाणपूर येथील गायत्री संस्कार ट्रस्ट येथे हिंदू रीती-रीवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला. लग्न लावून 30 जानेवारी रोजी रात्री नववधूस, यावल येथे आणण्यात आले व गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी येथील फालक नगरातील ब्युटी पार्लर मध्ये नववधूस पती चित्तरंजन गर्गे यांनी तिला सोडले पार्लरमध्ये वेळ लागणार असल्याने गर्गे घरी निघून गेले पुन्हा एक तासाने नववधूस घेण्यासाठी आले असता नववधूने पार्लर मधून पलायन केले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
गावात सर्वत्र शोध घेतला असता नववधू आढळून आली नाही. गर्गे यांनी तातडीने घरी जात घरचे कपाटातील वस्तूंचा शोध घेतला असता 50 हजार रुपयांची रोकड व 15 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याचे तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतरन गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात बर्‍हाणपूर येथील अशोक सुधाकर जरीवाले, शिर्डी येथील शीला साईनाथ अनर्थे, नाशिक येथील नववधू माया संजय जोशी नववधूचा भाऊ प्रकाश संजय जोशी व प्रकाश जोशी यांची पत्नी अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.


कॉपी करू नका.