जळगाव जिल्ह्यात 12 पोलीस निरीक्षकांसह दहा सहा.निरीक्षकांना मिळाले नवीन पोलीस ठाणे
In Jalgaon district, ten six inspectors including 12 police inspectors got new police stations जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील 12 पोलीस निरीक्षकांसह दहा सहा.निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्ह्याबाहेरून आलेल्या अनेक अधिकार्यांना नवे पोलीस ठाणे मिळाले आहे तर नियंत्रण कक्षात नियुक्तीच्या प्रतीक्षेतील अधिकार्यांनाही आता नव्याने नियुक्ती देण्यात आली आहे. बदली व नियुक्ती झालेल्या अधिकार्यांना तातडीने आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
एलसीबीची धूरा निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे


एलसीबीचा कार्यभार असलेले पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांच्याकडे आता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची पूर्ण वेळ जवाबदारी देण्यात आली आहे.
दीपक किसनराव बुधवंत हे नंदुरबार येथून पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन शाखेत रूजू होणार आहेत.
दत्तात्रय युवराज निकम हे मुंबई लोहमार्ग स्थानकातून जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात बदलून आले आहेत.
जिविशा सुरक्षा येथे कार्यरत असणारे महेश रघुनाथ गायकवाड हे भुसावळ तालुका पोलीस स्थानकाची धुरा सांभाळणार आहेत.
भुसावळ शहरच्या निरीक्षकपदी राहुल तुकाराम वाघ तर नाशिकहून आलेल्या मुरलीधर माधव कासार यांना जामनेरला नियुक्ती देण्यात आली आहे. बोदवड निरीक्षक राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ यांना रामानंदनगर पोलीस स्थानकाची धुरा देण्यात आली आहे.
नागपूर शहर येथे कार्यरत असणारे अरविंद विनायक भोळे हे बोदवड येथील पोलीस स्थानकाचा कार्यभार सांभाळतील. रामानंदनगरचे राजेंद्र कुटे यांना नियंत्रण कक्ष तर धरणगावचे उध्दव डमाळे यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली तसेच त्यांच्याकडे सायबर शाखेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपूर येथून पवन प्रतापराव देसले हे धरणगाव पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार सांभाळतील. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल गायकवाड यांच्याकडे जळगाव शहर वाहतून शाखेचा पदभार देण्यात आला आहे.
या सहाय्यक निरीक्षकांचय बदल्या
मुंबई शहर येथून सहायक पोलीस निरिक्षक विशाल पुंडलीक पाटील यांना सावदा पोलीस ठाण्यात
विशेष सुरक्षा विभागाचे उमेश महाले यांना भुसावळ शहर वाहतूक शाखेत
जालन्याहून आलेल्या प्रदीप बापू एकशिंगे यांना चाळीसगाव वाहतूक शाखेत
चाळीसगाव ग्रामीणचे प्रवीण अजयसिंग दातरे यांना मेहुणबारे ठाण्यात
नशिराबादचे रामेश्वर दगडू मोताळे यांना फैजपूर पोलीस ठाण्यात
फैजपूरचे निलेश नानाजी वाघ यांना नियंत्रण कक्षात
एमआयडीसीचे आसाराम चिंतामण मनोरे यांना नशिराबाद स्थानकात
चोपडा शहर प्रशांत मधुकर कंडारे यांना पाळधी आऊटपोस्ट
मारवड येथील शीतलकुमार नाईक यांची ए.एच. टि. यू. जळगाव येथे
तर धरणगाव येथील सहा.निरीक्षक जिभाऊ तुकाराम पाटील यांना मारवड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.
