धुळे एलसीबी निरीक्षकांसह 27 कर्मचारी महासंचालक सन्मानचिन्हाचे मानकरी

जळगावला 12, धुळ्याला नऊ तर नंदुरबारला मिळाले सहा सन्मानचिन्ह


27 personnel from Khandesh awarded Director General of Police Medal of Honour 27 personnel from Khandesh awarded Director General of Police Medal of Honour भुसावळ : गुन्ह्यांचा जलदगतीने तपास आणि पोलीस कामकाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एका पोलीस निरीक्षकांसह 27 कर्मचार्‍यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली. सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांचाही समावेश आहे. पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली. त्यात खान्देशातील एका अधिकार्‍यासह 27 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

जळगावला 12 सन्मानचिन्ह
सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक संजय हरीदास पवार, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र हिरालाल कुमावत, जळगावचे चालक विनयकुमार भीमराव देसले, हवालदार सचिन सुभाष विसपुते, हवालदार सुनील अर्जुन माळी
हवालदार मनोज काशीनाथ जोशी, हवालदार राजेश प्रभाकर चौधरी, हवालदार सुनील माधव शिरसाठ, रवींद्र धोंडू घुगे, सचिन सुभाष विसपुते, तसेच नाईक विजय अशोक दुसाने, अल्ताफ सत्तार मन्सुरी, नाईक अमोल भरत विसपुते यांचा नावाचा समावेश आहे.

धुळ्यासह नंदुरबारला 15 सन्मानचिन्ह
समादेशक सदाशीव येलचंद पाटील, उपअधीक्षक राजकुमार शंकर शिंदे, धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, निरीक्षक रामकृष्ण नारायण पवार, उपनिरीक्षक योगेश सीताराम राऊत, धुळे प्रशिक्षण केंद्राचे हवालदार रवींद्र वसंत गायकवाड, हवालदार संदीप धनाजी सरग, प्रकाश रणछोड सोनार, जाकिरखॉ नवाजखॉ पठाण या धुळ्यातील कर्मचार्‍यांसह नंदुरबारचे निरीक्षक राजेश आनंदराव चौधरी, हवालदार विलास भटू पाटील, लक्ष्मीकांत दगडू निकुंभ, हवालदार रवींद्रसिंग स्वरूपसिंग पाडवी, नाईक गोपाल हिंमतराव चौधरी व पंकज उत्तम महाले यांनाही सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. महाराष्ट्रदिनी जिल्हास्तरावर त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्याहस्ते हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.


कॉपी करू नका.