कोरपावली गावात सट्टा जुगार खेळतांना एकाला अटक


यावल : तालुक्यातील कोरपावली येथे सट्टा जुगार खेळवतांना एकास ताब्यात घेण्यात आले. गावातील मोहराळा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून रोख रक्कम सह सट्टा जुगार खेळवण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
कोरपावली, ता.यावल या गावांमध्ये नवीन वसाहत भागात मोहराळा रस्त्यावर असलम तडवी (57) हा इसम सट्टा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान यावल पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने मोहराळा रस्त्यावर कारवाई करीत असलम तडवी यास पकडले व त्याच्या कडून सट्टा जुगार खेळवण्याचे साहित्य जप्त केले. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.


कॉपी करू नका.