आमदार एकनाथराव खडसे स्पष्टच म्हणाले ; सरकारला कर्नाटकात प्रचाराला जाण्यासाठी वेळ आहे मात्र उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्याला मदतीसाठी नाही

MLA Eknathrao Khadse fired arrows at Shinde government; Barsu is not a private property, जळगाव : गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात, प्रामुख्याने खानदेशात अवकाळी पाऊस, वादळ वारा आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्नाटकमध्ये प्रचाराला जाण्यासाठी वेळ आली मात्र अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकर्यांसाठी बैठका घ्यायला, त्यांना मदत करायला वेळ नाही, अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
एक रुपयांचीदेखील मदत नाही
आम्ही शेतकर्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. नुकसानग्रस्तांना मदत करु, असे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र अजून तरी शेतकर्यांना एक रुपयाची देखील मदत झाली नाही. असेही खडसे म्हणाले.
बारसू कुणाची खासगी मालमत्ता नाही
बारसू रिफायनरीबद्दल मत भिन्नता असू शकते, परंतु बारसु ही कुणाची मालमत्ता नाही, त्यामुळे तिथं जायला कुणीच मज्जाव घालू शकत नाही. भाजपने आव्हान दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे दौरा केला. उद्धव ठाकरेंनी बारसु दौरा केल्याने त्याची सहानुभूती शिवसेनेला मिळेल या भीतीनेच भाजपने मोर्चाची घोषणा केली. प्रकल्पग्रस्तांची सहानुभूती मिळविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. भाजप या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही खडसे यांनी केली.


