छतावर झोपलेल्या शेतकर्याचा तोल जावून पडल्याने मृत्यू : कुरंगी गावात शोककळा

Death of a farmer sleeping on the roof after he lost his balance: Mourning in Kurangi village पाचोरा : घराच्या छतावरुन पाय घसरून पडल्याने कुरंगीतील अल्पभूधारक शेतकर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुभाष चिंधा पाटील (47) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
कुरंगी गावात हळहळ
सुभाष पाटील हे उन्हाळ्याचे दिवस असल्याने छतावरच झोपले असताना रविवारी पहाटेच्या सुमारास अंदाज चुकल्याने अचानक त्यांचा पाय घसरला व ते छतावरुन खाली पडल्याने डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल भगवान बडगुजर करीत आहे. मयत सुभाष पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.


