अट्रावलच्या शेतकर्‍याला धमकी देत केळी पिकांचे नुकसान : दोघांविरोधात गुन्हा


Damage to banana crops by threatening Atraval farmer: Crime against two यावल : तालुक्यातील अट्रावल येथील शेतकर्‍याला मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करीत तुमचे लोक विनाकारण आमच्यावर संशय घेतात. आमच्या नादी लागू नका नाहीतर तुम्हाला शेती करू देणार नाही, अशी दोघांनी धमकी दिली. नंतर शेतकर्‍याच्या शेतात जाऊन केळी कापून फेकली यात शेतकर्‍याचे 20 हजारांचे नुकसान करण्यात आले.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
अट्रावल येथील शेतकरी नितीन व्यंकट चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, घनश्याम भास्कर चौधरी व कमलाकर रामकृष्ण महाजन (अट्रावल) यांनी त्यांना मोबाईलवर कॉल करीत तुमचा सुपरवायझर हा विनाकारण आमच्यावर संशय घेतो, त्याला समजून द्या, आमच्या नादी लागले तर तुम्हाला शेती करू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी शेट गट क्रमांक 201 व 205 मध्ये जावून शेतातील कापणी योग्य झालेल्या केळीचे खोडं कापून फेकले. त्यात 20 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी दोघांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.

 


कॉपी करू नका.