रेल्वे सुरक्षा बल अधिक हायटेक : बुलेटद्वारे गस्तीसह गुन्हेगारी रोखण्यावर भर
भुसावळ विभागातील 14 आरपीएफ स्थानकांना बुलेटचे वितरण
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 14 रेल्वे स्थानकावरील आरपीएफ कर्मचार्यांना रेल्वे प्रशासनातर्फे 14 बुलेटचे वितरण करण्यात आले. भुसावळ विभागातील 14 आरपीएफ स्थानके आणि चौक्यांना बुलेट गाड्यांचे वितरण करण्यात आले.
या स्थानकांना मिळाली बुलेट
यात, मनमाड वर्कशॉप, चाळीसगाव, जळगाव, बडनेरा सेंट, बडनेरा वर्कशॉप, मूर्तिजापूर, भुसावळ लोको, भुसावळ राखीव, भुसावळ सेंट, नाशिक रोड, नाशिक टीएमडब्ल्यू, मलकापूर, अकोला आणि खंडवा येथे नवीन बुलेट मोटरसायकल प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अजय सदानी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या हस्ते देण्यात आल्यात.
डीआरएम कार्यालयात कार्यक्रम
हा कार्यक्रम डीआरएम कार्यालयात पार पडला. नवीन बुलेट मोटारसायकलींच्या वितरणामुळे आरपीएफ स्टेशन आणि आरपीएफ चौक्यांवर तैनात अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ गुन्हेगारांना पकडणे सोयीचे होणार आहे शिवाय गुन्ह्यांच्या ठिकाणी पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे, यावेळी आरपीएफ आयुक्त एच.श्रीनिवास राव उपस्थित होते.
