रावेरात जिल्हाधिकार्‍यांनी दोन गोदामांना ठोकले सील


Collector sealed two godowns in Raver रावेर : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी रावेर शहरात अचानक छापा टाकून दोन गोदाम सील केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या गोदामात रेशनचा तांदूळ संशयास्पदरीत्या साठवून ठेवल्याचा संशय आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी दुपारी अचानक बर्‍हाणपूर रस्त्यावरील चौधरी ट्रेडर्सच्या गोडावूनवर छापा टाकला. या ठिकाणी 200 तांदळाचे व गव्हाचे कट्टे आढळून आले तर मोठया प्रमाणावर रेशनचे रिकामे बारदान मिळाले आहे. येथे रेशनच्या गहू व तांदळाचा काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच ठिकाणी मका व ज्वारीचा साठा आढळला.

याच भागातील शेख नामक व्यक्तीच्या गोडवूनची जिल्हाधिकारी मित्तल यांनी झडती घेतली असता तेथे रेशनचे काही कट्टे मिळून आले. तांदूळ कोठून आणला याची महिती व कागदपत्र उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे चौधरी ट्रेडर्स व शेख यांचे बर्‍हाणपूर रस्त्यावरील गोडावून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सील करण्याची कारवाई केली. दरम्यान महसूल प्रशासनाकडून या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांच्याशी संपर्क होवू शकला नाही तर कारवाईवेळी प्रांताधिकारी कैलास कडलग तहसीलदार बंडू कापसे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !