सांगवी बुद्रुक गावातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
A young man of Sangvi Budruk village committed suicide by hanging himself यावल : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावातील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. या प्रकरणी यावल पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र उत्तम तायडे (38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जितेंद्र हा तरुण आपल्या घरी होता घरी असताना त्याने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस नाईक किशोर परदेशी व संदीप सूर्यवंशी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी हेमंत उत्तम तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे. दारूच्या व्यसनामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
