संतापजनक ! : चुलत भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न


Rape of minor girl in Pachora taluka : Crime against cousin पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावात सुट्यांमध्ये आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर नात्याने चुलत भाऊ असलेल्या संशयिताने अंगलट करीत जबरदस्ती केली तसेच मुलीचा गळा दाबण्याचा प्रकारही केल्याची घटना घडली 5 रोजी रात्री 11.30 वाजता घडली. या प्रकरणी पीडीतेने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिनाभरानंतर पीडीतेने दिली तक्रार
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी शालेय सुट्या असल्याने आपल्या आजीच्या घरी आली. 5 मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास या चुलत भावाने अल्पवयीन चुलत बहिण झोपलेली असतांना तिच्याशी अंगलट केल्यानंतर पीडीता जागी झाल्याने तिने विरोध केल्यानंतर आरोपीने गळा दाबून जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केळा. या प्रकरणी चुलत भाऊ विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !