भुसावळ बार असोसिएशन ‘एक आदर्श बार’ : न्या.यू.एम.पदवाड


भुसावळ : भुसावळ बार असोसिएशनतर्फे झालेला भव्य सत्कार अविस्मरणीय असून भुसावळ वकील संघातील प्रत्येक वकिलांमध्ये असल्यास समन्वय, विविध महापुरुषांच्या जयंती, गॅदरींग कार्यक्रमातून दिसून येतो. भुसावळ बार असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद असून हा भुसावळातील बार आदर्श असल्याचे गौरवोद्गार न्या.यु.एम.पदवाड यांनी येथे काढले. जिल्हा न्यायाधीश यू.एम.पदवाड यांची नागपूर येथील औद्योगिक न्यायालयात बदली झाल्यानंतर त्यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यांची कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती
अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव, दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) पांजनकर, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) डी.बी.डोमाळे, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) के.एस.खंडारे, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) के.एम.पत्रे, एस. व्ही.न्यायाधीश, भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, कोषाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्वर कोळी, सहसचिव पी.आर.पाटील, महिला प्रतिनिधी अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, सदस्य अ‍ॅड.विजय तायडे, ज्येेष्ठ वकील उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड.राजेश कोळी यांनी केले. जिल्हा न्यायाधीश यांनी एक वर्षात केलेले कामकाज याबद्दल वकील संघातील अ‍ॅड.वी.आर.घोलप, अ‍ॅड.धीरज शंकपाळ, अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.कात्यायनी, अ‍ॅड.वैशाली चौधरी, अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, अ‍ॅड.तुषार पाटील आदींनी मनोगतातून आढावा मांडला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !