फैजपूर शहरातील आदिवासी हक्क परीषद यशस्वी करण्यासाठी कामाला लागा : विनोद सोनवणे


Work to make Tribal Rights Council successful in Faizpur city : Vinod Sonwane भुसावळ : फैजपूर शहरात 9 जून रोजी आदिवासी हक्क परीषद होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर या परीषदेसाठी विशेष उपस्थित राहणार आहे. ही परीषद यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व परीषद यशस्वी करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी येथे केले. शहरातील पंचशील नगरातील शहिद अब्दुल हमीद हॉलमध्ये रविवारी दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पक्षातर्फे जोरदार तयारी
आदिवासी समुदायाला जागृत करणे त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पक्षाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे येत्या 9 जूनला फैजपूर येथे येत असून ते आदिवासी समुदायास मार्गदर्शन करणार आहे. यासाठी पक्षातर्फे जोरदार तयारी सुरू झाली आहे. ही परीषद यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी हक्क परीषदेसंदर्भात प्रचार प्रसार करावा, तन, मन, धनाने सहकार्य करावे, असे आवाहन येथील शहिद अब्दुल हमीद हॉलमध्ये आयोजीत बैठकीत बोलताना विनोद सोनवणे यांनी केले.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, याकुब शेख नजीर, जिल्हा आयटी प्रमुख सचिन बार्‍हे, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, तालुका महासचिव राजेंद्र गवळी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, शहर महासचिव देवदत्त मकासरे, जामनेर तालुका संघटक अक्षय निराळे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, सलीम शेख, जिल्हा संघटक अरुण तायडे यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !