क्राईम ब्रँचमध्ये नोकरीच्या आमिषाने भुसावळातील एकाला आठ लाखांत गंडवले : नाशिकच्या माय-लेकींविरोधात गुन्हा


A man in Bhusawal was cheated of eight lakhs by the lure of a job in the crime branch: a case against Nashik’s My-Lakes भुसावळ : क्राईम ब्रँचमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून नात्याने साली लागणार्‍या महिलेने आपल्या मुलीच्या माध्यमातून भुसावळातील सेवानिवृत्ताची तब्बल आठ लाखात फसवणूक केली. या प्रकरणी नाशिकच्या दोघांविरोधात बााजरपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे मागताच आत्महत्येची दिली धमकी
सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत रघुनाथ मेढे (62, फालक नगर, वैष्णवीदेवी मंदिरामागे, भुसावळ) यांचा मुलगा सुमित मेढे यास नाशिक येथे क्रॉईम ब्रँच विभागात ओळखीच्या माध्यमातून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून संशयित आरोपी कल्पना संजय सोनवणे व साक्षी संजय सोनवणे (दोन्ही रा.जनार्दन स्वामी नगर, दसक, जेल रोड, नाशिक) यांनी 28 डिसेंबर 2022 ते 23 मार्च 2023 दरम्यान वेळोवेळी एकूण आठ लाख रुपये उकळले.

बाजारपेठ पोलिसात अखेर गुन्हा
मुलाला नोकरी न लागल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर मेढे यांनी नात्याने साली असलेल्या कल्पना सोनवणे यांच्याकडे आठ लाखांची मागणी केली मात्र संशयित महिलेने मी आत्महत्या करेल व तुमचे नाव फसवून देईल, अशी धमकी दिली व पैसे देण्यास नकार दिला. या नंतर मेढे यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे तक्रार दिल्यानंतर सोमवारी दुपारी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !