लाच भोवली : जैताणेतील मंडळाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
सात हजारांची लाच भोवली : लाचखोरांमध्ये खळबळ
Bribery : District Magistrate Dhule in Jaitane in ACB’s net धुळे : साक्री तालुक्यातील जैताणे येथील मंडळाधिकार्याला तडजोडी अंती सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीने बेड्या ठोकल्या. हा सापळा बुधवारी सायंकाळी जैताणे, ता.साक्री येथे तक्रारदाराच्या घरी यशस्वी करण्यात आला. विजय वामन बावा (46) असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांची मौजे भामेर, ता.साक्री येथे गट क्रमांक 43, 44 अशी शेतजमीन आहे. या जमिनीची कौंटुंबिक वाटणी करावयाची असल्याने त्यांनी निजामपूर मंडळ अधिकारी विजय बावा यांची 16 जून 2023 रोजी भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराकडे 18 हजार मागण्यात आले व त्यात तडजोड होवून 15 हजार रुपये देण्याचे ठरले व आठ हजार रुपये मंडळाधिकार्याने अॅडव्हान्स घेतले. उर्वरीत लाच द्यावयाची नसल्याने तक्रारदाराने 16 जून रोजी तक्रार नोंदवून पडताळणी केली व लाचेतील उर्वरीत सात हजारांची रक्कम तक्रारदाराकडे स्वीकारण्यासाठी मंडळाधिकारी बुधवारी सायंकाळी येताच पथकाने त्यास अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.