भुसावळात महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून माय-लेकावर हल्ला

आठवडे बाजारातील घटना : मुख्य संशयित ताब्यात : बाजारपेठ पोलिसांची कामगिरी


Attack on My-Leka for having an affair with a woman in Bhusawal भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून महिलेच्या तरुण मुलाने भाजीपाला विक्रेत्या तरुणासह त्याच्या आईवर नारळ सोलण्याच्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 20 जून रोजी शहरातील आठवडे बाजारात घडल्याने या भागात प्रचंड घबराट पसरली. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली. जीवन लक्ष्मण चौधरी (30) व बेबाबाई लक्ष्मण चौधरी (52, आठवडे बाजार, मच्छीमार्केट, भुसावळ) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या माय-लेकांची नावे आहेत.

महिलेच्या घरी तरुणाला पाहताच संशयितांचा हल्ला
जीवन चौधरी हा तरुण भाजीपाला विक्री करून आपल्या कुटूंबाचा रहाटगाडा ओढण्यासाठी मदत करतो. तरुणाच्या घराशेजारी काही महिन्यांपूर्वीच एक महिला व तिचा मुलगा वास्तव्यास आल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली मात्र ही महिला कालांतराने भाड्याचे घर खाली करून पंचशील नगरात वास्तव्यास गेली. त्यानंतर जीवन हा तरुण त्या महिलेच्या संपर्कात असल्याने मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याने महिला उपाशी असल्याने तिच्यासाठी अंडाभुर्जी आणली व दोघे जेवण केल्यानंतर गप्पा करीत असताना महिलेचा मुलगा तथा संशयित राहूल राजपूत व त्याच्या मामांचा मुलगा आदित्य या दोघांनी जीवनला पाहताच अश्लील शिविगाळ सुरू केली.

तरुणाने पळ काढताच कोयत्याने केले वार
महिलेचा मुलगा आल्यानंतर जीवन चौधरी याने महिलेच्या घरातून काढता पाय घेत घराचा रस्ता धरला असताना पाठीमागून आलेल्या दोघा संशयितांनी बेसावध असलेल्या जीवनवर नारळ सोलण्याच्या कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यावर, मानेवर, चेहर्‍यावर सपासप वार केल्याने तरुण रक्तबंबाळ झाला तर वाद सोडवण्यासाठी जीवनची आई बेबाबाई आल्यानंतर तिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवण्यात आला व हल्लेखोर पसार झाले.

तरुणावर गोदावरीत उपचार
कोयता हल्ल्यानंतर आठवडे बाजारात खळबळ उडाल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला सुरूवातीला ट्रामा सेंटरमध्ये व तेथून गोदावरील आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे तर तरुणाची आई बेबाबाई देखील कोयत्या हल्ल्यात जखमी झाल्याने तिच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हवालदार सुनील जोशी यांनी तरुणाचा गोदावरीत जावून जवाब नोंदवल्यानंतर संशयित राहूल राजपूत (20) व त्याच्या मामांचा मुलगा आदित्य भानगडे (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य संशयित राहुल राजपूत यास बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !