मुक्ताईनगर तालुक्यातील 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी : कुटूंबाला ठार मारण्याची धमकी
A 20-year-old girl was assaulted in Muktainagar taluka मुक्ताईनगर : तरुणीशी ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच अश्लील व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी 20 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.
कुटूंबाला ठार मारण्याची धमकी
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात 20 वर्षीय तरुणी आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. जून महिन्यात एकेदिवशी तरुणी घरी जात असतांना तिला रस्त्यात गाठत फारुख सुलतान पठाण (23) याने जबरीने ओढून नेत मारहाण करत आई, वडील, भाऊ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत राहत्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ बनविला.
लग्नास नकार देताच पुन्हा अत्याचार
सुमारे 25 दिवसांनी पुन्हा पिडीत तरुणीवर पुन्हा एकदा फारुखने धमकी देत अत्याचार केला तसेच लग्नासाठी जबरदस्ती केली. पीडीत तरुणीने लग्नास नकार दिल्याने फारुखने मोबाईलमध्ये केलेले व्हिडीओ व्हायरल करण्यासह नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली तसेच आई, वडील, भाऊ यांना मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर आरोपीच्या लहान भाऊने पीडीतेच्या चुलत लहान भावासह आतेभावाला मारहाण केली. पीडीतेने तक्रार दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.
