Suryakanya birth anniversary भुसावळात सूर्यकन्येच्या जन्मोत्सवानिमित्त महावस्त्र अर्पण

जन्मोत्सव सोहळा उत्साहात : तापीप्रती शहरवासीयांची कृतज्ञता


Mahavastra offering for the birth anniversary of Bhusawal Suryakanya भुसावळ : हिंदू धर्माच्या ग्रंथ व पुराणात उल्लेख असलेल्या तसेच भुसावळ विभागासह जिल्ह्यात समृद्ध करणार्‍या सूर्यकन्या तापी मायीचा जन्मोत्सवानिमित्त रविवार, 25 जून रोजी इंजिन घाटाजवळ तापी नदीची विधीवत पूजाअर्चा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तापीनदीला साडी, चोळी वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जीवनदायी तापी नदीचे भुसावळ शहरासह विभागाला वरदान लाभले असून तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्ताने रविवारी तापी उत्थान एवम उत्सव सेवा समिती, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था, नॅशनल युथ क्लब, सप्तशृंगी माता बहुउद्देशीय संस्था, बहुभाषिक ब्राह्मण समाज, विश्व ज्योती उत्सव मंडळ, चिंतामणी मोरया ग्रुप, जय लेवा ग्रुप आदी सहयोगी संस्थांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
तापी उत्थान उत्सव सेवा समिती सह विविध संस्थांनी पुढाकार घेत जन्मोत्सव साजरा केला. नदीची ओटी भरून महावस्त्र म्हणजे साडी व चोळी नदीला अर्पण करण्यात आली. यावेळी तापी प्रेमी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते . पूजा झाल्यानंतर उपस्थितांना तापी नदीचे धार्मिक महत्त्व पं. जयप्रकाश शुक्ला यांनी विषद केले. भौगोलिक महत्त्व पीपल्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय बाविस्कर उपस्थित होते. प्रा.ढाके यांनी तापी नदीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांनी आभार मानले. नदीपात्रात जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून व मंगल वाद्य वाजवून वातावरण निर्मिती करण्यात आली. सकाळी 9 वाजता तापी नदी पात्रात तापी नदीच्या पूजनाला पं. जयप्रकाश शुक्ला यांनी पुजाविधी केला. यंदा सात जोडप्यांनी महापूजेत लाभ घेतला.

यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
तापी उत्थान येऊन उत्सव सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत वैष्णव, अ‍ॅड. मेघा वैष्णव, गोविंद अग्रवाल, संतोष टाक ,गोकुळ अग्रवाल, सखी श्रावणी महिला बहुउद्देश्य मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नेवे, उमेश नेवे, भाग्यश्री नेवे, माया चौधरी ,वंदना झांबरे, सीमा नेवे, मनीषा कुलकर्णी ,अर्चना इंगळे, जयश्री वाणी, आराधना चौधरी, मोहिता चौधरी तसेच गो सेवक रोहित महाले, प्रसाद भापकर आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !