लेवा पाटीदार समाजाच्या समस्या सुटण्यासाठी युवा फोरमची भूमिका महत्त्वाची

आमदार राजूमामा भोळे : समाजबांधवांना सर्वोतोपरी मदतीची ग्वाही


भुसावळ : लेवा पाटीदार समाज हा जगभरात विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असला तरी अनेक समस्या असल्याने त्यांचे निराकरण करण्यासाठी नियोजीत युवा फोरम हे महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही आमदार राजूमामा भोळे यांनी येथे दिली. भुसावळातील रामानंद हॉलमध्ये आयोजीत लेवा समाज विकास मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. समाजबांधवांनी आपल्याला केव्हाही कोणत्याही समस्येच्या निराकरणासाठी कॉल करावा, असे सांगून त्यांनी संपर्कादाखल दोन्ही क्रमांकही समाजबांधवांना दिले.

विविध विषयांवर चर्चा
लेवा पाटीदार समाजाच्या एकजुटीसाठी व विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गावा-गावांमध्ये लेवा पाटीदार युवा सेना, फोरमची उभारणी करणे, समाजाच्या उत्थानासाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, आधुनिक शेतीकडे समाजाला वळविण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करणे आदींसह विविध विषयांवर लेवा समाज विकास मंथन कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. शहरातील जळगावरोडवरील रामानंद हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला राज्यभरातून समाजबांधवांची उपस्थिती होती. विकास मंथन कार्यक्रमात समाज संघटीत करणे व प्रबोधन करणे, पावागडपासून एकता ज्योत घेवून समाज ज्या ज्या गावात विखुरलेला आहे. त्या ठिकाणी ज्योत पोचविणे, उच्चशिक्षीत आणि बहूसंख्य समाज असूनही आर्थिक, राजकियदृष्या मागे आहे असल्याने सर्व घटकांतील समाजबांधवांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणे, समाजातील शेतकरी बांधवांचे प्रश्न गांभीर्याने सोडविणे आणि त्यांची होणारी आर्थिक लूट थांबविणे. समाजातील तरुण वर्गाला आधुनिक शेतीकडे वगळविण्यासाठी विविध कार्यशाळा व कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करणे आदी चर्चा करण्यात आल्या. भुसावळ शहरात आंतरराष्ट्रीय लेवा समाज महाअधिवेशन घेण्याचे नियोजनावरही चर्चा करण्यात आली.

समाजाची एकजूट आवश्यक : नामदेव ढाके
गावखेड्यातील समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील प्रतिष्ठीतांनी मदतीचा हात दिला पाहिजे. समाजातील शेतकर्‍यांना आधुनिक पध्दतीच्या शेतीची माहिती दिल्याचे त्यांचे जीवनमान उंचावेल. समाजातील तरुण स्पर्धा परिक्षांकडे वळायला हवा. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून विविध क्षेत्रात प्रगती करता येईल. समाजाच्या कोणत्याही चांगल्या कार्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे मत यावेळी पिंप्रीचिंचवड येथील नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांचे नुकसान थांबवणार
समाजबांधवांवर होणार अन्याय आगामी काळात सहन केला जाणार नाही. गुंडगिरी, घरगुती भांडण, भाऊबंदकीचे वाद मिटविण्यासाठी संपूर्ण समाजाचे एकीकरण होणे अपेक्षीत आहे. समाजातील शेतकरी बांधवांची व्यापार्‍यांकडून होणारी लूट, शेतीमधील पिकांचे आकसबुध्दीने करण्यात येणारे नुकसान आदींबाबतही या मंथन कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. हे सर्व प्रकार बंद करण्यासाठीही व्यापक नियोजन केले जाणार आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे, पुणे येथील महापालिकेचे माजी सत्ताधारी पक्षाचे गटनेते नामदेव ढाके, जळगावचे बंडू काळे, माजी आमदार नीळकंठ फालक, डॉ.मिलिंद चौधरी, शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय जावळे, मुंबई येथील किरण बढे, केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्या निता अत्तरदे, हर्षल भंगाळे, पुरुषोत्तम पिंपळे, प्रविण झांबरे, डॉ. विजय झांबरे, प्रल्हाद बोंडे आदींसह राज्यभरातून समाजबांधवांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ.मिलिंद पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी अजय पाटील, निलेश महाजन, शिशिर जावळे, हेमंत चौधरी, अमोल सोनार, मयूर सराफ, शुभम झांबरे, गौरव झांबरे, शुभम सोनार, भूषण पाटील, पार्थ पाटील, पवन शिंदे यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !