विद्येच्या माहेरघरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
In Vidya’s house, an attempt was made to attack a girl with a knife due to one-sided love
पुणे : विद्येच्या माहेरघरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने दोन तरुणांनी धाडस टळल्याने अप्रिय घटना टळली. पुण्यातील मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ भागात ही घटना घडली. या प्रकरणी पेरुगेट पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

तरुणाच्या प्रसंगावधानाचे कौतुक
सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिराजवळ रस्त्याने एक तरुणी ‘मला वाचवा, मला वाचवा ’ म्हणून ओरडत जात असताना संशयित आरोपी मात्र कोयता हातात घेऊन पळत असताना नागपूर हॉटेलजवळ सदर तरुणीवर त्याने एक वार तिच्यावर केला. त्यानंतर तरुणी पुढे पळत आल्यानंतर कॅनरा बँकेच्या चौकात तरुणी खाली पडताच आरोपी तिच्यावर वार करणार तोच एका तरुणाने धाडस दाखवत त्यास हल्ला करण्यापासून रोखण्यात आले तर अन्य आणखी दुसर्या तरुणाने मदत करीत आरोपी तरुणाच्या हातातील कोयता बाजूला केला. त्यानंतर संबंधित तरुणाला पेरुगेट पोलीस चौकीत पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले.