भुसावळातील चहल धाब्यानजीक तीन हजार बायोडिझेल जप्त : पंपाला लावले सील


भुसावळ : भुसावळ-वरणगाव महामार्गावर असलेल्या चाहेल ढाब्यासमोर अवैधरीत्या बायोडीझेलची विक्री होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्याने त्यांनी तत्काळ भुसावळ महसूल विभागातील पुरवठा विभागाचे अधिकारी पाठवल्यानंतर तीन हजार लिटर बायोडीझेल मिळून आल्याने ते अधिकार्‍यांनी जप्त करीत पंपाला सील लावले आहे.

तक्रारीअंती प्रशासनाची कारवाई
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शहरातील चहल धाब्याजवळ अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. आदेशानंतर भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, प्रभारी तहसीलदार अंगद आसटकर यांना सूचना दिल्यावरून तत्काळ पुरवठा निरीक्षक व अन्य कर्मचारी यांनी चहल ढाबा गाठला तेथे त्यांना टाकीमध्ये तीन हजार लिटर बायोडिझेल मिळून आले. यावेळी त्याच्या सोबत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

कारवाईने उडाली खळबळ
तीन हजार लिटर बायोडिझल व एक नोझल मशीन मिळाले तर या बायोडीझल केंद्रावर शेख रईस शेख रशीद हे सेल्समन कामाला होते. महसूल व पोलिसांनी जप्त केलेला बायोडीझेलचा साठा तेथे पंचासमक्ष सील करण्यात आला, असे तहसीलदार अंगद आसटकर यांनी सांगितले. याप्रकरणाची चौकशी प्रांताधिकारी जितेद्र पाटील करीत आहे. त्यांना तहसीलदार यांनी अहवाल सादर केला आहे. महसूल विभागाच्या कारवाईमुळे अवैध बायोडिझेल विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !