अल्पवयीन मुलीवर अत्याचार : कुविख्यात आरोपी शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात


Abuse of minor girl : Notorious accused in Shirpur police net शिरपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या कुविख्यात आरोपीच्या शिरपूर शहर पोलिसांनी सुरत शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. दिनेश सुदाम कोळी उर्फ धाप दिल्या (वाल्मीक नगर, शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्या विरोधात शहर पोलिसात चोरीचे पाच तर अन्य पोलीस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल आहेत.

अत्याचार करीत पलायन
एका अल्पवयीन मुलीचे मंगळवार, 18 रोजी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास नराधम आरोपीने अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती तर घटनेनंतर आरोपी पसार झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर शहर पोलिसांकडून त्याचा सर्वत्र शोध सुरू असतांना गुजरात राज्यातील बारडोली येथील गंगाधरा रेल्वे स्टेशन परीसरातून त्याला अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, शिरपूर पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बार्‍हे, गणेश कुटे, संदीप मुरकुटे, हेमंत खैरनार, पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, रवींद्र अखडमल, विनोद अखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंखे, सचिन वाघ, आरीफ तडवी व मनोज दाभाडे आदींनी केली आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !