शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : सात जिवंत काडतूस, चार कट्ट्यांसह सातार्याचे दोघे जाळ्यात
Great achievement of Shirpur Taluka Police : Seven live cartridges, four Katta along with two from Satara in the net शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सातार्यातील दोघांना पाठलाग करीत अटक केली असून संशयिताकडून चार गावठी कट्टे व सात जिवंत काडतूस जप्त केले आहेत. निलेश हनुमंत गायकवाड (30, वडगाव हवेली, ता.कराड, जि.सातारा) व मनीष संजय सावंत (22, सोमवारपेठ, कराड, जि.सातारा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना संशयितांबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून दोघे संशयित पायी येत असताना त्यांना थांबवण्याचा इशारा केला मात्र संशयित पसार होवू लागल्यानंतर पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. अंगडतीत सात जिवंत काडतुसे तसेच चार गावठी कट्टे आढळल्यानंतर संशयितांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, सुनील वसावे, मंगला पवार, संदीप ठाकरे, संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, ईसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.




