आठ जिवंत काडतूस व तीन गावठी कट्ट्यासह श्रीरामपूरातील संशयित जाळ्यात

शिरपूर तालुका पोलिसांची धाडसी कारवाई : उमर्टी पुन्हा चर्चेत


Suspects in Srirampur net with eight live cartridges and three village knives शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गावठी कट्ट्यांविरोधात धडक कारवाईचा सपाटा कायम ठेवला असून श्रीरामपूरातील संशयिताला आठ जिवंत काडतूस व तीन गावठी कट्ट्यांसह पकडल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. सईद मोहम्मद सय्यद (31, श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. या कारवाईने अवैधरीत्या शस्त्र बनवणारे उमर्टी पुन्हा पोलिसांच्या ऐरणीवर आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूरचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांना उमर्टी येथून अवैधरीत्या शस्त्र घेवून जात असलेल्या संशयिताची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर भोईटी गावाजवळ सापळा रचला. स्वीप्ट डिझायर कार (एम.एच.12 क्यूजी 0472) आल्यानंतर तिची झडती घेतला असता चालकाकडे एक लाख 35 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी कट्टे तसेच आठ हजार रुपये किंमतीचे आठ जिवंत काडतूस तसेच पाच लाख रुपये किंमतीचे स्वीप्ट असा एकूण सहा लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित सईद मोहम्मद सय्यद (31, श्रीरामपूर) याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, कृष्णा पाटील, हवालदार सागर ठाकूर, संतोष पाटील, योगेश मोरे, रोहिदास पावरा, इसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !