राईनपाडा ग्रामपंचायत सदस्याचा सर्पदंशाने मृत्यू
Rainpada Gram Panchayat member dies of snakebite साक्री : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गजमल दहिलू पवार (71) हे शनिवार, 22 रोजी पहाटे 4.10 वाजेच्या सुमारास शेतातील घरात बैलांना चारा टाकत टाकत असताना सर्पदंश झाला व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
सर्पदंशाची घटना घरच्यांच्या लक्षात येताच पवार यांना उपचारासाठी रोहोड येथील प्राथमिक केंद्र व पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते बारापाडा, चौपळे, पंचक्रोशीत आदिवासी पावरीनृत्य कलाकार होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा परीवार आहे.




