धुळ्यासह पुण्यात दुचाकींची चोरी : ‘सलमान खान’ एलसीबीच्या जाळ्यात
चोरीच्या सहा दुचाकी जप्त : अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Theft of two-wheelers in Pune with Dhula : ‘Salman Khan’ in LCB’s net धुळे : अट्टल दुचाकी चोरट्याला धुळे गुन्हे शाखेने अटक केली असून संशयिताच्या ताब्यातून चोरी केलेल्या सहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सलमान खान गफ्फार खान पठाण (मौलवीगंज, चांदतारा चौक, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयित हा कुविख्यात असून त्याच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल आहे. आरोपीने धुळ्यातील आझादनगरसह पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत तसेच पुण्यातील शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून चार लाख रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील, निलेश पोतदार, प्रसाद वाघ, सुशील शेंडे, गुणवंत पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.




