धुळ्यात गावठी कट्ट्यासह आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Accused in Dhule along with Gavathi Kattya in crime branch net धुळे : धुळे गुन्हे शाखेने गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करणार्याच्या मुसक्या बांधत त्याच्या ताब्यातून एक जिवंत राऊंड व गावठी कट्टा हस्तगत केला आहे. त्रिशूल रमेश सूर्यवंशी (32, शारदा नगर, मधुबन बंगल्यासमोर, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. धुळे शहरातील देवपूर भागातील हिम हॉटेलच्या बाजूला संशयित दिसताच त्यास मंगळवारी अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मच्छिंद्र पाटील, नाईक रवीकिरण राठोड, निलेश पोतदार, सुशील प्रकाश, शेंड सागर शिर्के, गुणवंत पाटील आदींच्या पथकाने केली.




