धुळ्यात टँकर पलटी होताच डिझेल लुटण्यासाठी नागरीकांची झुंंबड
As soon as the tanker overturned in the dust, citizens swarmed to loot the diesel धुळे : शहरातील गुरुद्वाराजवळ सुरतहून इंदोरच्या दिशेने भरधाव वेगाने डिझेल घेवून जात असताना टँकर उलटला व यावेळी टँकरला गळती लागली. नेमकी ही संधी साधून नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी वाहून जाणारे डिझेल लुटण्यासाठी गर्दी केली. ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. या प्रकारामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.
मिळेल त्या साधनांनी लांबवले डिझेल
मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरूद्वाराजवळ सुरतहून इंदोरच्या दिशेने एक टँकर निघाला असता नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्याच्या कडेला जावून उलटला व डिव्हायडरचा धक्का लागल्याने टँकरमधून गळती सुरू झाली. अचानक झालेल्या या अपघाताने महामार्गावर एकच गोंधळ उडाला. तातडीने ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस व अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी वाहनधारकांसह नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी गळती लागलेली डिझेल लांबवण्यासाठी मोठी गर्दी केली. या दुर्घटनेत टँकर चालक जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली.




