चाळीसगावात कृषी दुकान फोडले : भामटा चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात जाळ्यात
Agricultural shop smashed in Chalisgaon: Bhamta caught in the net of Chalisgaon police चाळीसगाव : शहरातील घाट रोडवरील कृषी केंद्रा फोडून सुमारे पस्तीस हजारांची रोकड चोरीला गेली होती. शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आनंदा राजु सरोदे (पारोळा रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सीसीटीव्हीद्वारे आरोपी जाळ्यात
19 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्याच्या चोरी झाली होती. चोरट्याने दुकानाच्या ड्रावरमधून 35 हजारांची रोकड लांबवली होती.सतीष बाबुराव भालारे (चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे संशयित निष्पन्न केला.
यांनी केली कारवाई
चाळीसगावचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश बेलदार, दीपक पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, नंदकिशोर महाजन, प्रवीण जाधव, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, विनोद खेरणार आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली. दरम्यान, आरोपी कृषी दुकानासह चाळीसगाव शहरातील एका भांडे विक्री करणार्या दुकानातून एक मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे.




