भुसावळात गांजा ओढणार्यावर कारवाई
Action against ganja smoker in Bhusawal भुसावळ : मानवी आरोग्याला अपायकारक असलेला गांजा चिलीमद्वारे ओढताना पोलिसांनी शेख अन्वर शेख अकबर (32, आगाखान वाडा, फिरोज किराणा दुकानाजवळ, भुसावळ) यास ताब्यात घेत त्याच्याविरोधात कारवाई केली.
संशयित रेल्वे स्थानकाजवळील केला सायडींग भागात रीक्षा स्टॉपजवळ बुधवारी रात्री साडेसात वाजता चिलीम ओढताना आढळल्याने त्याच्याविरोधात कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.








