यावल शहरातून दुचाकी चोरी : एकाला कानळद्यातून अटक
Two-wheeler theft from Yaval City : One arrested यावल : शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील साई मोटर गॅरेज समोरून मोटरसायकल चोरी केल्याप्रकरणी कानळदा, ता.जळगाव येथून एकास अटक करण्यात आली. यापूर्वी या गुन्ह्यात दोघांना पोलिसांनी अटक केली होती व एक संशयित पसार होता. त्यालादेखील अटक करीत न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
चोर्या उघडकीय येण्याची शक्यता
यावल शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी किरणसिंग कृष्णाजी पाटील यांची मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 सी.एन. 6543) ही चोपडा रस्त्यावरील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ असलेल्या साईबाबा गॅरेज समोरून चोरीला गेली होती. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करतांना ही मोटरसायकल सागर कैलास सपकाळे, नरेंद्र ज्ञानेश्वर सोनवणे व यश संजय बाविस्कर (तिघे राहणार कानळदा, ता.जळगाव) यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. यातील दोघांना या पूर्वीच अटक करण्यात आली व आता पसार असलेल्या यश बाविस्कर (20) याला गुरूवारी यावल पोलिसांनी अटक केली. यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्यासमोर हजर केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळ करीत आहे.








