दक्षिण ध्रुवावर उतरले चंद्रयान- 3 : भुसावळ विभागात जल्लोष
ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी अन् मिठाई वाटप ः विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उळसात
भुसावळ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिलाच देश म्हणून भारताने गौरव मिळवल्यानंतर चांद्रयान- 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भुसावळ विभागात जल्लोष करण्यात आला. ठिकठिकाणी लाईव्ह कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले तर विद्यार्थ्यांनी कमालीचा उत्साह दाखवत चंद्रयान- 3 चंद्रावर स्थिरावताच फटाक्यांची आतषबाजी केली तसेच पेढे, जिलेबी व मिठाई वाटप करून जल्लोष केला.
भुसावळ साई निर्मल फाऊंडेशनचा जल्लोष
भुसावळ : शहरातील साई निर्मल फाउंडेशन आणि शंकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रयान- 3 लँडिंगच्या ऐतिहासिक विजयाचा उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडून व शहरवासीयांना जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी तलाठी ऑफिससमोर जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे तथा शंकर फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव नन्नवरे, डॉ.राजेश मानवतकर उपस्थित होते. अक्षय पवार, सागर साबळे, बंडू चौधरी, अंकुश राजपूत, सुमित शिरसाट, कैलास चौधरी, पियुष भोळे, सागर धांडे, राणे ब्रदर्स, मुरली लोखंडे, मंगेश लोखंडे, प्रशांत सुरवाडे, रघुनाथ कोळी आदी उपस्थित होते.

भोळे महाविद्यालय
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भारताने चंद्रावर यशस्वीरीत्या चंद्रयान-3 लँड करत इतिहास रचल्यानंतर जल्लोष करण्यात आला. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश बनला आहे. त्यानिमित्त महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन एन.एस.एस व भूगोल विभागातर्फे करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.अनिल नेमाडे , डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.डी.एस.राणे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे व भूगोल विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी कळवतात.
श्री बडा हनुमान मंदीरात संगीतमय सुंदरकांड
भुसावळ ; संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चंद्रयान- 3 च्या सफलतापूर्वक अभियानानिमित्त भुसावळ येथील राम मंदिर वार्डातील प्राचीन श्री बडा हनुमान मंदिरात सुंदर कांडचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम अभियान यशस्वी करणार्या आपल्या भारत देशातील इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यात आले. चंद्रयान- 3 सफल व्हावे म्हणून श्री बड़ाहनुमान मंदिरात दुपारी सर्व भाविकांनी संगीतमय सुंदरकांडचे आयोजन केले. अभियान यशस्वी झाल्यानंतर हनुमंताची सर्व भाविकांतर्फे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी आतिषबाजी करण्यात आली. उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी श्री बडा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदासजी वैष्णव, राजेश भारडिया, कृष्णा भराडिया, गोविंद अग्रवाल, राजू जयस्वाल, राजश्री भराडिया, विनोद गोरखा, राजीव पटेल, राजपूत समाज महिला मंडळ, मेघा वैष्णव, भारती वैष्णव, विमल वैष्णव, नलिनी नेवे, डॉन पुरोहित, रमेश ईखनकर, राजेश अग्रवाल, श्याम अग्रवाल आदी उपस्थित होते.
