यावल तालुक्यात वीज कंपनीचे लाखोंचे लघूदाबाचे विद्युत तार लांबवले


In Yaval taluka, electricity company’s low-voltage power lines were extended
यावल :
यावल तालुक्यातील भुसावळ रस्त्यावरील घोडे पीर बाबाच्या दर्गाह जवळील पाटचारीच्या लगत टेंभी शेत-शिवारातून तसेच वडोदा गावाजवळील शेतातून अज्ञात चोरट्यांनी वीज वितरणचे लघुदाबाचे विद्युत तार लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. टेंभी शिवारातून एक हजार 800 मीटर 62 हजार रुपये किंमतीचे तर वडोदा येथून दोन हजार 400 मीटर 79 हजार रुपये किंमतीचे तार चोरीला गेले. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा यंत्रणेकडून शोध
यावल-भुसावळ रस्त्यावर घोडे पीर बाबांचा दर्गाह असून दर्गाहजवळील पाटचारीला लागून टेंभी शेत शिवारात प्रभाकर पाटील यांच्या शेत गट क्रमांक 58 आहे. त्यात राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या रोहित्रापासून खांब क्रमांक पाच ते नऊ व रमेश शंकर वाणी यांच्या गट क्रमांक 75 पर्यंतच्या खांबावरील लघुदाबाचे विद्युत तार अज्ञात चोरट्याने लांबवले. तब्बल एक हजार 800 मीटर लांबीचे हे तार असून त्याची किंमत 62 हजार रुपये आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राज्य विद्युत वितरण कंपनीचे वीज तंत्रज्ञ आकाश अनिल लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.







वडोदा शिवारातून 79 हजारांचे तार चोरी
वडोदा शेत शिवारातदेखील बारा खांबावरील दोन हजार 400 मीटर लघ वाहिनीचे अ‍ॅल्युमिनियमचे 79 हजार रुपये किंमतीचे तार चोरीला गेेले. याप्रकरणी देखील भूषण पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !