भुसावळात विद्यार्थ्यावर चाकूहल्ला : चौकडीविरोधात गुन्हा


Knife attack on student in Bhusawal : Crime against quartet भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील मशिदीजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या सायकलला धडक देवून चाकूने हल्ला करण्यात आला तर अन्य संशयितांनी मारहाण केल्याची घटना पंचशील नगरात सोमवार, 21 रोजी रात्री घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादातून मारला चाकू
शाहीम शेख मुजाहिद (16, मटन मार्केटजवळ, भुसावळ) हा विद्यार्थी आपल्या परीवारासह वास्तव्याला असून तो दहावीचे शिक्षण घेतो. सोमवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता शाहीम शेख हा दुचाकीने जात असतांना संशयित शेख तौसीफ उर्फ बाबू शेख फिरोज दुचाकीद्वारे धडक दिली व याचा जाब विचारला असता शेख तौसीफ याने चाकू काढून पायावर व हातावर मारून दुखापत केली तसेच रेहान शेख फिरोज, फिरोज शेख आणि शेरा उर्फ गोलू शेख फिरोज शेख (सर्व रा.पंचशील नगर, भुसावळ) यांनीदेखील चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या शाहीम शेख याला भुसावळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शुक्रवार, 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार अर्चना अहिरे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !