बामणोद शेत-शिवारातून 65 हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या लांबवल्या


Drip tubes worth 65 thousand rupees were extended from Bamanod Shet-Shiwar यावल : यावल तालुक्यातील बामणोद येथील शेत शिवारात शेती पिकाला पाणी देण्यासाठी शेतात अंथरलेल्या ठिबक नळ्या अज्ञात चोरटयांनी लांबवल्या. 65 हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या चोरी झाल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठिबक नळ्या चोरट्यांचा पोलिसांकडून कसून शोध
बामणोद, ता.यावल येथील शेतकरी प्रदीप रामकृष्ण सपकाळे यांनी आपल्या शेत गट क्रमांक 1122 मध्ये पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक नळ्या अंथरलेल्या होत्या. शेतातील 65 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या ठिबकच्या नळ्या अज्ञात चोरट्याने शेतातून चोरी केल्या. हा प्रकार हा सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी प्रदीप सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !