मालोदच्या 21 वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ


Malod’s 21-year-old married woman harassed for two lakhs यावल : यावल तालुक्यातील मालोद येथील माहेर असलेल्या एका 21 वर्षीय विवाहितेचा रीक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे म्हणून तिघांनी छळ केला व पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत माहेरी पाठवून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
मालोद, ता.यावल येथील माहेर असलेल्या दिव्या विक्की सोनवणे (21) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह कानळदा, ता.जि.जळगाव येथील विक्की महेंद्र सोनवणे या तरुणासोबत झाला होता. विवाहनंतर पती विक्की महेंद्र सोनवणे, मोनिका गोविंद मेढे व अनुसया लक्ष्मण सोनवणे या तिघांनी माहेरून रीक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी या विवाहितेचा शारीरीक आणि मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ करून मारहाण केली व पैसे आणले नाही म्हणून माहेरी सोडून दिले. या विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिघा विरुद्ध विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !