एमपीतील परीवहन बसला बिजासन घाटात अपघात : दोघांचा मृत्यू
शिरपूर : इंदौरहून नाशिकला येणार्या मध्य प्रदेश परीवहन विभागाच्या बसला भीषण अपघात झालल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर 30 प्रवासी जखमी झाले. मध्यप्रदेश आगाराची ही बस बिजासन घाटात आल्यानंतर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातानंतर वाहतूक ठप्प
धुळ्यानजीकच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ब्रेकफेल ट्रकने बसला मागून धडक दिल्याने बस मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर पलटली होती. ही बस सेंधवाकडून शिरपूरच्या दिशेने निघाली होती.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बिजासन पोलीस दाखल झाले. बस रस्त्यावरच पलटी झाल्याने वाहतूक खोळंबली होती. नागरिकांच्या मदकार्य करण्यात आले. यावेळी जखमींना सेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.




