साक्रीनजीक पुलावरून भरधाव कार कोसळली : मामासह भाची भार
धुळे : साक्रीनजीक शेवाळी रस्त्यावर भरधाव कार नियंत्रण सुटल्याने पूलावरून कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात कारमधील मामासह भाचीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. सुभाष रुपला बागुल (वय 40) आणि त्यांची भाची मोहिनी उर्फ चिऊ पांडुरंग साबळे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत.
धुळ्याकडे येताना अपघात
साक्री तालुक्यातील अंबोडे येथील सुभाष रुपला बागुल (वय 40) आणि त्यांची पत्नी भारती सुभाष बागुल (38) हे भाची मोहिनी उर्फ चिऊ पांडुरंग साबळे (3, रा.कुडाशी, ता.साक्री) हिला घेऊन कार (एम.एच.18 ए.एल. 9528) ने धुळ्याकडे निघाले असताना शनिवारी सकाळी शेवाळी रस्त्यावर हॉटेल उदय पॅलेसजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुलावरून थेट खाली कोसळल्याने डोक्याला मार लागल्याने सुभाष बागुल हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी भारती बागुल आणि भाची मोहिनी साबळे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना कारमधून बाहेर काढत धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले परंतु त्यांची भाची मोहिनी हिला मार लागल्याने रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू ओढवला तर जखमी भारती यांच्यावर उपचार सुरू आहेत.




