सातपुड्याच्या अभय अरण्यात वनरक्षकास मारहाण


यावल : सातपुड्याच्या अभय अरण्यात वनरक्षकास मारहाण सातपुड्याच्या अभयारण्यात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काही जण गुर चराईसाठी आग्रह धरत होते त्यांना विरोध केल्याच्या कारणावरून त्यांनी थेट वनरक्षकाला मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मध्य प्रदेशातील दोघांविरूध्द तक्रार देण्यात आली.

सातपुड्याच्या अभयारण्य्यात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा आहे. या सीमेवर वन्यजीव विभागाचे वनरक्षक एस.व्ही.बारेला हे वन कामगार व मनमजुरांसोबत गस्तीवर होते. येथे मध्यप्रदेशातील माजल, ता.झिरण्या, जि.खरगोन येथील सुरेश सुक्राम बारेला व दिनेश सुक्राम बारेला हे दोघे भाऊ गुरं चराईसाठी आले होते. त्यांना वनरक्षक बारेला यांनी गुरं चराई करण्यास मनाई केली. त्याचा राग येऊन या दोघासह त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही जणांसह वनरक्षक बारेला यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याने त्यांना डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही सुरू होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !