भुसावळ हादरले : गडकरी नगरात अवघ्या 15 मिनिटात दाम्पत्यावर हल्ला करीत दोन लाखांचा ऐवज लूटला

मध्यरात्रीचा थरार ः किचनची खिडकी तोडून केला घरात प्रवेश ः गस्त नसल्याची बाब गुन्हेगारांच्या पथ्थ्यावर


Bhusawal shook: In just 15 minutes in Gadkari Nagar, a couple was attacked and looted of two lakhs. भुसावळ : शहरातील गडकरी नगर, भवानी माता मंदिर परीसरातील सेवानिवृत्त वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात किचनची खिडकी तोडून घरात तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण करीत एक लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीच्या ऐवजासह सुमारे दोन लाखांच्या ऐवजाची लूट केली. ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गस्त होत नसल्याची बाब चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली असून आतातरी पोलीस प्रशासनाने या भागात गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गडकरी नगरात मध्यरात्री केली लूट
वरणगाव महामार्गाजवळील भवानी माता मंदिर परीसरातील गडकरी नगरात रेल्वेतील इलेक्ट्रीकल जनरल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजय त्र्यंबक कुळकर्णी (72) व निवृत्त शिक्षिका माधुरी कुळकर्णी (68) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. मध्यरात्री कुलकर्णी दाम्पत्य झोपल्यानंतर रात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी किचनची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. सुरूवातीला चोरट्यांनी घरातील सर्व परीसर फिरून कपाटातील ऐवज काढला व नंतर घरात सुरू असलेला नाईट लॅम्प फोडून दाम्पत्यास उठवले. अचानक चोटे समोर येताच विजय कुलकर्णी यांनी त्यांना प्रतिकार केल्यानंतर चोरट्यांनी पितळी प्लॉवर पॉटने दाम्पत्यावर जबर हल्ला चढवल्याने दाम्पत्य रक्तबंबाळ झाले. यावेळी दाम्पत्याने जे पाहिजे ते घ्या मात्र मारहाण करू नका, अशा विनवण्या केल्या. मारहाणीत विजय कुळकर्णी यांच्या नाकाचे हाड मोडले गेले व डोक्यालाही मार लागला तर पत्नीच्या कपाळालाही गंभीर ईजा झाली.







अंगठ्या निघत नसल्याने चोरट्यांनीच लावले पाणी
चोरट्यांनी यावेळी दाम्पत्याच्या हातातील अंगठ्या मागितल्या मात्र त्या निघत नसल्याने चोरट्यांनी घरातून पाणी आणले व पाणी लावून स्वतःच बळजबरीने अंगठ्या ओरबाडल्या. सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, पोत, कानातील दागिणे तसेच कपाटातील अन्य दागिण्यांसह सुमारे दिड लाखांची रोकड असा मिळून एकूण चार लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घरातील लाईट बंद असल्याने संपूर्ण खोलीत असलेला अंधार व नाईट लॅम्पही चोरट्यांनी फोडल्याने केवळ मोबाईल टॉर्चच्या उजेडात ही लूट करण्यात आली शिवाय चेहरा ओळखू येवू नये यासाठी चोरट्यांनी तोंडालाही रूमाल बांधला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य बेशुद्ध झाले व दहा मिनिटांनी त्यांना जाग आल्यानंतर त्यांनी चोरटे गेल्याची खातरजमा करीत शेजारील रहिवासी तुषार सोनोले यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.

दाम्पत्यावर पहाटे उपचार : कपाळासह डोक्याला पडले टाके
सोनोले यांनी कुलकर्णी यांच्याकडे धाव घेतल्यानंतर परीसरातील नागरीकांना उठवले तसेच स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनीदेखील धाव घेत बाजारपेठ पोलिसांना सूचित केले. कुळकर्णीच यांचे साडू विजय जोशी यांनाही माहिती कळवण्यात आली तर पहाटेच्या सुमारास दाम्पत्याला डॉ.तुषार पाटील यांच्याकडे आणल्यानंतर विजय कुलकर्णी व माधुरी कुलकर्णी यांच्या डोक्यावर व कपाळावर टाके घालण्यात आले तर विजय कुळकर्णी यांच्या नाकाला पितळी प्लॉवर प्लॉटमुळे ईजा झाल्यानंतर त्यांना जळगावातील खडके हॉस्पीटलला हलवण्यात आले.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
प्रभारी डीवायएसपी कुणाल सोनवणे, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड, सहायक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, बाजारपेठचे विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, जावेद शहा, सचिन चौधरी, महेश चौधरी तसेच एलसीबीचे कमलाकर बागुल, रणजीत जाधव आदींनी भेट देत पाहणी केली. जळगावातील डॉग स्कॉड तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदिरापर्यंत मार्ग दाखविला. दरम्यान, या परीसरातील चोरट्यांची छबी कैद झाली असून त्याद्वारे आता चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !