बोदवडला कोतवालावर हल्ला : त्रिकूटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Attack on Bodwad Kotwal: Trikuta was handcuffed by the police बोदवड : वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्याचा रागातून कोतवालाला मारहाण करीत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवण्यात आले होते. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी महसूल कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलियांनी या गुन्ह्यात तीन संशयितांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून अटक केली.
मारहाण करीत लांबवले ट्रॅक्टर
मंगळवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान शहरातील महात्मा फुले चौकात कोतवाल गजानन सुरेश अहिरे (33) यांनी अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एम.एच.19 ई.ए.4249) अडवल्यानंतर संशयिताना राग आला व ल्यांनी धमकी देत मारहाण करण्यात आली होती व जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले होते. बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी जंगलू मांगो मोरे (40, भिलाटी, बोदवड), अनिल एकनाथ शेळके (45, जामठी दरवाजा, बोदवड) व सुधाकर ओंकार राठोड (21, रा.पळासखेडा, ता.बोदवड) या तिघांना बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरातून अटक केली. संशयितांकडून चोरून नेलेले ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहे.








