यावलच्या सेवानिवृत्त तहसीलदारांचा बसमध्येच हृदयविकाराने मृत्यू


Retired tehsildar of Yaval died of heart attack in the bus यावल : शहरातील महाजन गल्लीत रहिवासी व सेवानिवृत्त नायब तहसीलदार वसंत गणपत पाटील (86) यांचा बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 15 दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

बसमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका
यावलचे रहिवासी असलेले वसंत पाटील हे जळगाव येथे डोळे तपासणीसाठी ते शुक्रवारी सकाळी गेले होते व काम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात जळगाव-यावल बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.0953) ने येत असतांना गिरडगावजवळ त्यांना साडेचार वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका आला व ते कोसळल्यानंतर काही वेळेत त्यांचा मृत्यू झाला. \]







बेशुद्ध अवस्थेत तत्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनी तपासणी करीत मृत घोषित केले. धावत्या बसमध्ये प्रवासशाचा मृत्यू झाल्याची पंधरा दिवसातील ही दुसरा घटना घडली. वाहक रोशनी सोनवणे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल एस.टी.आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, वाहतूक चालक दिलीप ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली.े



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !