प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची : कटनी एक्प्रेस उद्यापासून रद्द


Passengers this news is very important for you: Katni Express canceled from tomorrow भुसावळ : भुसावळ-कटनी एक्स्प्रेस 18 ते 24 दरम्यान रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. पश्चिम-मध्य रेल्वेतर्फे पायाभूत सुविधांच्या कामामुळे ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांंची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

या कारणास्तव रद्द झाली गाडी
भुसावळ-कटनी एक्सप्रेस (19013) ही गाडी 16 ते 23 सप्टेंबर दरम्यान तसेच गाडी (19014) कटनी-भुसावळ एक्सप्रेस गाडी 17 ते 24 सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. ही गाडी रद्द झाल्यामुळे व्यापार्‍यांसह चाकरमान्यांची मोठी गैरसोय होणार आहे. या गाडीने सावदा, रावेर, बर्‍हाणपूर, नेपानगर येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी जा-ये करतात मात्र आता गाडी रद्द झाल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदालाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !