भुसावळातील गडकरी नगरात जबरी लूट : संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना
Forced robbery in Gadkari Nagar in Bhusawal : Two teams of police have been dispatched to search for the suspects भुसावळ : शहरातील गडकरी नगरात झालेल्या जबरी लूट प्रकरणी पोलीस प्रशासनाने तपासचक्रे गतिमान केली असून संशयीत पोलिसांच्या नजरेत असून दोन पथके तपासार्थ रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्यरात्री दाम्पत्यावर केला होता हल्ला
गडकरी नगरातील विजय त्र्यंबक कुळकर्णी व त्यांची पत्नी माधुरी कुळकर्णी यांच्यावर गुरुवारी पहाटे दोन चोरट्यांनी पितळी फुलदाणीने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर स्थानिक स्तरावर तसेच जळगावात उपचार करण्यात आले. महामार्गापासून काही अंतरावरील गडक्री नगर परीसरातील तुळजा भवानी माता मंदिर परीसात झालेल्या जबरी लूटनंतर या परीसरातील रहिवासी धास्तावले होते.








