भुसावळातील वेगवेगळ्या भागातून दोन दुचाकी लांबवल्या
Two bikes were dragged from different parts of Bhusawal भुसावळ : शहरातील जुना सातारा, खळवाडी भागातून चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांनी दुचाकीस्वारांमध्ये घबराट
सतीश प्रभाकर भोळे (52) हे नोकरदार असून त्यांच्या मालकिची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ई.डी.7414) घराबाहेर लावली असताना गुरुवार, 15 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवली. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर भोळे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार कविता विसपुते करीत आहेत.






रामायण नगरातून दुचाकी लांबवली
भुसावळ ः बाजारपेठ हद्दीतील रामायण नगरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याचा प्रकार 13 ते 14 दरम्यान घडला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
सुनील बैजनाथ वर्मा (44, रामायण नगर, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्या मालकिची दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ए.एच.0565) ही घराबाहेर लावली असताना चोरट्यांनी 13 ते 14 सप्टेंबरदरम्यान संधी साधून दुचाकी लांबवली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.


