आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड शहरात बाईक रॅली


बोदवड  : मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड शहरातून शुक्रवारी बाईक रॅली काढण्यात आली व या रॅलीचा मुक्ताईनगरात समारोप झाला. शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले.

यांचा रॅलीत सहभाग
बोदवड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्या घरापासून रॅलीला सुरूवात झाली व समारोप मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर झाला. बोदवड नगरपंचायत व तालुक्यातील नागरीकांद्वारे सत्कार आमदार चंद्रकांत पाटील यांचा करण्यात आला. रॅलीत नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, सामाजिक कार्यकर्ते हर्षल बडगुजर, गोलु बरडीया, माजी नगरसेवक दिनेश माळी, माजी नगरसेवक सुनील बोरसे, देवा खेवलकर, राजेश ननवानी, संजय गायकवाड, नितीन चव्हाण, मयूर बडगुजर, निलेश माळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !