वढवेतील गावात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या तरुणाला बेड्या
The young man who created terror at the point of sword in the village of Vadve is in shackles मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे हातात तलवार घेऊन परीसरात दहशत निमाृण करणार्या तरुणाला मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. गोकुळ समाधान पाटील (36, वढवे, ता.मुक्ताईनगर) असे अटकेतील तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना माहिती मिळताच कारवाई
वढवे येथे शनिवारी दुपारी दोन वाजता आरोपी गोकुळ पाटील हा हातात तलवार घेऊन वढवे गावातील परीसरात दहशत निर्माण करून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर, प्रशांत चौधरी, रवींद्र धनगर यांनी कारवाई करीत दुपारी दोन वाजता संशयित आरोपी गोकुळ समाधान पाटील याला अटक केली तसेच त्याच्या गुरांच्या चार्यात लपवून ठेवलेली तलवार हस्तगत जप्त करण्यात आली.








