मुक्ताईनगर जवळ विचित्र अपघात : पूर्णाडचे दोन तरुण जागीच ठार, चौघे गंभीर
Strange accident near Muktainagar : Two Purnad youths killed on the spot, four seriously मुक्ताईनगर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या विचित्र अपघातात पूर्णाड येथील दोन तरुण ठार झाले तर चौघे जखमी झाल्याची घटना शहरातील बर्हाणपूर रोडवरील स्मशान भूमीजवळ मंगळवारी सकाळी घडली.
अपघातात दोघे जागीच ठार
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ हेदेखील मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आले होते मात्र परतीच्या प्रवासात समोरून येणार्या दुचाकीसोबत धडक झाल्याने रोहित व प्रदीप यांचा जागीच मृत्यू झाला तर समोरील दुचाकीवरील कमलेश सुभाष पाटोळे, लिलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे हे जखमी झाले तर या विचित्र अपघातात पाठीमागून येणारे दुचाकीस्वार अशोक गंगाराम सावळे हेदेखील गंभीर जखमी झाले. या अपघातात रोहित मुकेश गाढे (19, पूर्णाड) तसेच प्रदीप छगन वाघ (28, पूर्णाड) यांचा जागीच मृत्यू झाला. कमलेश सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे, लिलाबाई सुभाष पाटोळे (चांगदेव) तसेच अशोक गंगाराम सावळे (पातोंडी, ता.रावेर) हे गंभीर जखमी झाले.






आमदार चंद्रकांत पाटील यांची धाव
अपघाताची माहिती कळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना प्रथमोपचार करून तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणीताई खडसे यांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर गाठून जखमी रुग्णांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस कर्मचार्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, पूर्णाड येथील एकाने आत्महत्या केल्यानंतर दोघांचा गणेश चतुर्थीच्या दिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.


