भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याकडे पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना
Bhusawal MLA Sanjay Savkare installation of eco-friendly Ganesha भुसावळ : भुसावळ तालुक्याचे आमदार संजय वामन सावकारे यांनी प्रोफेसर कॉलनीतील निवासस्थानी मंगळवारी पर्यावरणपूर्वक गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली.
बळीराजाला सुगीचे दिवस येण्यासाठी गणरायाला प्रार्थना
आमदार यांच्या कन्या सुनिधी सावकारे हिने तिच्या हाताने गणेशाची मूर्ती तयार केली. गणपतीसाठी पत्तरवाळ्यांपासून आकर्षक सजावट करण्यात आली व या कामी आई रजनी सावकारे व भाऊ युगांक सावकारे यांनी मदत केली. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांनी सहपत्नीक गणेशाची स्थापना केली. यावेळी त्यांच्या आई सुशिलाबाई सावकारे उपस्थित होत्या. राज्यावरील संकटे दूर व्हावीत, बळीराजाला सुगीचे दिवस यावेत, सर्वांना सुख शांती लाभावी, अशी प्रार्थना यावेळी आमदारांनी केली.


